पाकिस्तानात ईदच्या मिरवणुकीत आत्मघाती स्फोट; 58 मृत्युमुखी, रस्त्यावर मृतदेहांचा खच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी  दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान आत्मघातकी स्पह्टांनी हादरले. ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन ठिकाणी झालेल्या या स्पह्टांमध्ये पोलीस उपअधीक्षकासह तब्बल 58 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले.

एका मशिदीजवळ हा स्पह्ट झाला. नमाज अदा केली जात असतानाच प्रचंड मोठा स्पह्ट झाला. तर पाकिस्तान मीडिया हाऊस ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ईद मिलादून नबी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हा स्पह्ट झाला. आत्मघाती हल्लेखोराने ऑन-डय़ुटी पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ  बॉम्बस्पह्ट घडवून आणला. ‘दि पाकिस्तानी फ्रंटीअर’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला मृतदेह पडल्याचे दिसत आहे. स्पह्टानंतर तातडीने परिसराची नाकाबंदी करून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली तसेच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.