हिंदुस्थानवर 26/11 सारखा हल्ला करण्याचा पाकडयांचा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानवर 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट पाकिस्तानने रचला आहे. त्यासाठी पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांना समुद्रमार्गे हिंदुस्थानवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अशी खळबळजनक माहिती गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे.

मुंबईवरील 26/11 सारख्या हल्ल्यास तोंड देण्यास हिंदुस्थान तयार आहे का ? पुन्हा एखादी दहशतवादी संघटना हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा कट आखत आहे का ? असा सवाल राज्यसभेत गृहमंत्रालयाला विचारण्यात आला. त्यावर अशी कोणतीच माहिती सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हिंदुस्थानवर 26/11 सारखा हल्ला करण्याचा पाकिस्तानने कट रचला आहे. त्यासाठी पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांना समुद्रमार्गे हिंदुस्थानवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अशी खळबळजनक माहिती गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यास 10 वर्ष झाले आहेत. या हल्ल्यात लश्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 166 नागरिकांची हत्या केली होती. मृतांमध्ये 28 अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यात 300 हून अधिक जण जखमी झाले होते. हा हल्ला 60 तास सुरू होता. दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते.