
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या हवाई दलाचे AN-32 हे विमान बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले असून अद्यापही या विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण असतानाच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने या विमानाच्या बेपत्ता होण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. वीणाचा हा आचरटपणा नेटकऱ्यांना न आवडल्याने त्यांनी तिला झोडपून काढले आहे.
#IAF An-32 hasn’t crashed.
Weather is too CLOUDY and Radars can’t detect it, – Military Scientist, PM Shree #NarendraModi @IAF_MCC @narendramodi— VEENA MALIK (@iVeenaKhan) June 3, 2019
‘#IAF An-32, या विमानाला अपघात झालेला नाही. तर हवामान खराब असल्याने रडारही त्याला शोधून काढू शकलेले नाही. Military Scientist, पीएम श्री.#NarendraModi @IAF_MCC @नरेंद्र मोदी.’ असे वीणाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यावर युजर्सनी तिला चांगलेच सुनावले आहे.
‘अचूक उदाहरण. ज्या ताटात खायचं त्याचं ताटात घाण करायची’, असे एकाने तिला म्हटले तर ‘पाकिस्तानींना चीप पब्लिसिटी मिळवणं खूप चांगल्याप्रकारे येतं. थापा मारायल्या चांगल्या येतात. सध्या काहीच काम मिळत नसल्याने आता हे पाकिस्तानी अशा प्रकारची कामं करत आहेत’ असे म्हटले आहे. तसेच ‘तुझ्या या भंपकपणामुळेच तू बॉलीवूडमधून गायब झालीस’, असेही काहीजणांनी तिला सुनावले आहे.
वीणा मलिकने याआधीही IAF विंग कमांडर अभिनंदन याच्यावर सोशल मीडियावर टीका केली होती.
Thrown out of bollywood someone left to full time tweeting out her frustration.
— The_Sanjna (@sanjna_singh__) June 3, 2019
The perfect example of “jis thaali mein khana usi mein chhed karna ” , waise tum logon ki aukaat hi yahi hai.
— Veg Omelette (@Veg_Omelette) June 4, 2019
@iVeenaKhan He was referring to cheap chineese made Pakistani radars and not the Indian radars.
— Manish Pundir (@manishpundir_28) June 5, 2019
























































