वाढवण बंदर आणि जिंदाल जेट्टी रद्द करा! पालघरच्या मच्छीमारांचे साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालघर जिह्यातील वाढवण बंदर व जिंदाल जेट्टी रद्द करण्याचे साकडे आज मच्छीमारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातले. कोकणातील नाणार प्रकल्प शिवसेनेच्या रेटय़ामुळे राज्य सरकारने रद्द केला तसेच हे दोन्ही प्रकल्प रद्द करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पालघरमधील कोळी बांधवांनी आपल्या विविध प्रश्नांबाबत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन आपली गाऱहाणी मांडली. धनगर समाजाप्रमाणेच आदिवासी महादेव कोळी व तत्सम जमातबांधवांनाही शिवसेनेने न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करणारे निवेदनही यावेळी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांना दिले.

त्याप्रसंगी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, कोळी समाजाचे पदाधिकारी नामदेव भगत, रामकृष्ण तांडेल, अशोक नाईक, जयवंत तांडेल, रमण नाईक, निशांत नाईक, समीर सागर, मोखाडय़ाच्या नगराध्यक्षा मंगला चौधरी, मदन भोई आदी उपस्थित होते.