
प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी हिला तिच्या चित्रपटाच्या सेटवर एका गाडीनेच धडक दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर हैदराबाद येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पल्लवी जोशी या त्यांचे पती विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट द वॅक्सिन वॉर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे शूटींग सुरू झालेले. सोमवारी पल्लवी जोशी शूटींग करत असतानाच सेटवरच्याच एका गाडीने त्यांना ठोकले. यात तिच्या पायाला दुखापत झाली. मात्र शॉट रेडी असल्याने पल्लवीने त्या शॉटचे शूटींग पूर्ण केले व नंतर ती रुग्णालयात दाखल झाली. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.



























































