सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
आयकर विभागाने एका सेंकदात पॅन कार्ड मिळेल अशी ‘इस्टंट’ प्रणाली सुरू केली आहे. या सुविधेतून अर्जदाराला काही क्षणात विनामूल्य ई-पॅन मिळणार असून ही सुविधा ठराविक कालावधीसाठी सुरू केली आहे. या कालवधीत अर्ज करणार्या अर्जदाराचा अर्ज ग्राह्य धरून आधार कार्ड असलेल्या अर्जदारालाच हे ई-पॅन कार्ड मिळेल. आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक जोडलेला असेल त्यावर एक वन टाईप पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. त्यावरून अर्जदाराला पॅन कार्ड मिळेल.
पॅन आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवली
अर्जदाराच्या आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पॅनवर नमूद असेल. ई-पॅन हे फक्त एका व्यक्तीसाठी असून ते एका कुटुंबं अथवा संस्थेसाठी नसेल. आधारवर आधारित पॅन कार्ड बनल्यानंतर अर्जदाराला ते पोस्टाने घरपोच मिळेल. ई-पॅनसाठी अर्जदारांनी https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर लॉग ईन करण्याचे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.

























































