पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभेची पोटनिवडणूक 19 मे रोजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 19 मे रोजी जाहीर झाली आहे. लोकसभेच्या शेवटच्या चरणा सोबत ही पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल बाकीच्या निवडणुकीबरोबर 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम –
22 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.
29 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे.
30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे.
2 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
19 मे रोजी निवडणूक होणार
23 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.