खापरेश्‍वर देवस्थानचे प्रमुख मानकरी पपन मेथर यांची आत्महत्या

536

मालवणातील कांदळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, खापरेश्‍वर देवस्थानचे प्रमुख मानकरी हेमकांत ऊर्फ पपन यशवंत मेथर (वय 56 रा. कोळंब) यांचा मृतदेह कोळंब-रेवंडी माळ रानावरील गोठण दोनवड येथील वडाच्या झाडास शुक्रवारी सायंकाळी गळफसा घेतलेल्या अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली काढला. पपन यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतदेहापासून काही अंतरावर झाडीझुडपात त्यांची मोटरसायकल उभी होती. त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.

कोळंब येथील रहिवासी असलेले पपन मेथर हे सर्जेकोट येथील श्रीदेव खापरेश्‍वर, कांदळगाव श्रीदेव रामेश्‍वराचे ते मानकरी होते. दत्तजंयतीला दुपारी ते घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी रेवंडी गोठण दोन वड येथे गेलेल्या स्थानिक ग्रामस्थांना एका व्यक्तीने वडाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांनी याची माहिती कोळंबमधील स्थानिकांना देताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, संतोष गलोले, प्रसाद आचरेकर, विवेक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मेथर यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पपन मेथर यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पपन यांच्या पश्चत पत्नी, दोन मुली, मुलगा व अन्य परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या