दहावीच्या निकालात परभणी चौथ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परभणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यात संभाजीनगर विभागाचा एकूण निकाल 75.20 टक्के लागला आहे. इयत्ता बारावी बरोबरच दहावीच्या निकालातही परभणी जिल्हा विभागात चौथ्या स्थानी आहे. परभणी जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल 66.35 टक्के लागला आहे. इयत्ता बारावीत मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल दहा टक्के अधिक लागला होता तर इयत्ता दहावीमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 16 टक्क्यांनी अधिक लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 70.28 टक्के निकाल परभणी तालुक्याचा निकाल लागला आहे तर सर्वात कमी 58.54 टक्के निकाल पालम तालुक्याचा लागला आहे.

परभणी जिल्ह्यातील 424 शाळांतून 28 हजार 964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यात 16 हजार 396 मुले तर 12 हजार 568 मुलींचा समावेश होता. यातील 15 हजार 766 मुले तर 12 हजार 353 मुली असे एकूण 28 हजार 119 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेत 18 हजार 657 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 9 हजार 386 मुले तर 9 हजार 271 मुलींचा समावेश आहे. याचबरोबर 3 हजार 592 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 5 हजार 902 विद्यार्थी प्रथम, 7 हजार 9 द्वितीय तर 2 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकालात 59.53 टक्के मुले तर 75.05 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परभणी तालुक्यातील 134 शाळांतून 10 हजार 719 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यात 10 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एकूण 7 हजार 293 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्णा तालुक्यातील 40 शाळांतून परीक्षेसाठी नोंदणी करणाNया 3 हजार 24 पैकी 2 हजार 920 जणांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली. यात 1 हजार 824 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गंगाखेड तालुक्यातील 56 शाळांमधून 3 हजार 300 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती यातील 3 हजार 138 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात 2 हजार 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालममधील 33 शाळांतील 1 हजार 457 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली यातील 1 हजार 394 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एकूण 816 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सोनपेठ तालुक्यातील 26 शाळांमधील 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 939 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात 603 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिंतूर तालुक्यातील 60 शाळांतून परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण 4 हजार 244 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 187 जणांनी परीक्षा दिली यात 2 हजार 602 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाथरी तालुक्यातील 26 शाळांतील 1 हजार 639 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यातील 1 हजार 610 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 1 हजार 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मानवत तालुक्यातील 20 शाळांमधील 1 हजार 265 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली तर यातील 1 हजार 239 जणांनी परीक्षा दिली. यातील 783 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेलू तालुक्यातील 29 शाळांमधून परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या 2 हजार 352 पैकी 2 हजार 315 जणांनी परीक्षा दिली याज 1 हजार 619 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.