ताडकळस खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी । परभणी

ताडकळस पोलीस ठाण्यांतर्गत पिंपरी देशमुख येथे जेसीबी ऑपरेटर संतोष लिंबाजी सांगळे यास मारहाण करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी तिघा आरोपींपैकी दोघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश आले होते. मुख्य सूत्रधार अजिंक्य उर्फ अजय जगताप यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या व ताडकळस पोलीसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद करून तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

अज्ञात मारेकऱ्यांनी एका जसेबी ऑपरेटरचा मारहाण करुन खून केल्याची तक्रार ताडकळस पोलीस ठाण्यात उमेश केपला रावत याने दिली. याप्रकरणी संगनमाताने खून केल्याचा गुन्हा अज्ञात आरोपीच्या विरोधात करण्यात आला होता. या गुन्ह्याचा कसून तपास करत रामेश्वर देवनाळे व वैभव मानवतकर यास सीताफीने अटक करून ताडकळस येथे हजर केले. त्यापाठोपाठ आता मुख्य सूत्रधार असलेला अजिंक्य दिगांबर जगताप उर्पâ अजय दिगांबर देशमुख हा फरारी होता. त्यास सीताफीने अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पोटेकर, अनिल लांडगे, सुनील गोपीनवार, सुग्रीव वेंâद्रे, मधुकर चट्टे, निलेश भूजबळ, जमीर फारोखी, धनंजय कनके, दिपक बेंडे, बाबासाहेब रोडे यांनी कामगिरी बजावली.