
कर्जत तालुक्यातील वाघिणीची वाडी येथे आदिवासींसोबत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवसेना परळ शाखा, परळची देवी कामगार मैदान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी लॅपटॉप आणि 2 टॅब देण्यात आले तर आदिवासी कुटुंबीयांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे खजिनदार सूर्यकांत शिंदे, युवासेना सहसचिव मुकेश कोळी, अमोल पाठारे, सुधाकर कदम, चंद्रकांत रासन, अंजुम जैतापकर, संतोष गुजर, सुहास पारकर, नीलकंठ जाधव, मानस जाधव, सुहास बाबर, अमोल म्हात्रे, प्रवीण बिद्र, गणेश भगत आदी उपस्थित होते.