
तटरक्षक दल, रत्नागिरी यांनी विजयदुर्ग ते देवगड दरम्यान 40 ते 45 वाव पाण्यात “पार्थ” हे 101 मीटर लांबीचे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याचे कळविले आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता झाला आहे. जहाजावरील खलाशी यांना वाचविण्यात आले आहे. परंतु सदर अपघातामुळे विजयदुर्ग ते मालवण समुद्र भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. तरी याबाबत सर्व मासेमार / नौका
मालक / खलाशी यांनी खबरदारी घ्यावी.
मासेमारी दरम्यान योग्य काळजी व दक्षता घ्यावी. किनारी भागात राहण्याऱ्या सर्व मासेमार यांनी देखील दक्षता घ्यावी. याबाबत संस्थेचा नोटीस बोर्ड, बंदर / मासळी उतरविण्याचे केंद्र येथे लिहण्यात यावे. आवश्यक ती विशेष काळजी व दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त मालवण यानी केले आहे.





























































