पाथर्डी: आश्रमशाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग, दोनजण अटकेत

64

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रकार मढी येथील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळेत मंगळवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांना अटक केली आहे.

मढी-तिसगाव रस्त्याजवळ चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेतील अधिक्षक नामदेव बबन धायतडक व शिक्षक ईश्वर सुखदेव सुरशे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थिनींचा विनयभंग केला, असा आरोप आहे.

काही विद्यार्थिनींनी मंगळवारी पालकांना घडलेली घटना सांगितली. त्यांनतर पालक मढी येथे आले. त्यांनी इतर मुलींच्या पालकांना माहिती दिली. पालक महिलांनी आश्रम शाळेतील दोन्ही शिक्षकांना पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंदविला आणि त्यांना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळाला बुधवारी सकाळी भेट दिली आणि माहिती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या