ड्रोनने वाहून नेले पॅथोलॉजीचे नमुने, देशातील पहिलाच प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या प्रत्येक क्षेत्रात ड्रोनची भरारी दिसून येत आहे. बहुउद्देशीय कामांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. आता तर पॅथोलॉजीचे नमुने वाहून नेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसे झाले तर दुर्गम भागातील लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

 गुरुग्राम येथे हॉस्पिटलमधून पॅथोलॉजी लॅबमध्ये  नमुने वाहून नेण्यासाठी चाचणी सुरू झाली आहे. चार दिवस ही चाचणी सुरू राहणार  आहे. त्यासाठी स्काय एअर मोबिलिटी आणि एसआरएल डायग्नोस्टिक यांनी हातमिळवणी केली आहे. गुरुग्राम येथे ड्रोनचाचणी 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर नोएडा येथेही ड्रोनची चाचणी घेतली जाणार आहे. गुरुग्रामच्या ड्रोन चाचणीत 10 रक्ताचे नमुने एसआरएल लॅबोरेटरीतून फोर्टीस एफएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. या चाचणीत ड्रोनेने  3.8 किलोमीटर अंतर पार केले.

याविषयी स्काय एअर मोबिलिटीचे सीईओ अंकित कुमार म्हणाले, हिंदुस्थानात प्रथमच ड्रोनने पॅथोलॉजीचे नमुने काहून नेण्याचा प्रयोग करत आहोत. यासाठीच्या चाचणीमध्ये ड्रोनच्या 36 फेऱया होणार आहेत.