मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना ‘ती’ म्हणत होती श्लोक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूरत येथील दया बुधेलिया यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना त्या भगवद्गीतेचे श्लोक जपत होत्या. शस्त्रक्रिया पार पडेपर्यंत सलग दीड तास त्यांनी श्लोक म्हटले. यामुळे डॉक्टरही चकीत झाले.

दया बुधालिया यांच्या मेंदूत गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना लकवा होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. 23 डिसेंबर रोजी न्यूरो सर्जन डॉ. कल्पेश शाह आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया तशी गंभीर असल्याने रुग्णाने शुद्धीत राहणे आवश्यक होते. ही गोष्ट जेव्हा दया यांना सांगण्यात आली तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे भगवद्गीतेचे श्लोक म्हणण्यास परवानगी मागितली. शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या श्लोक म्हणत होत्या.