रूग्णालयात वीज गेल्याने रूग्णांची झाली गैरसोय, मोबाईल बॅटरीच्या आधारे रूग्णाला घातले टाके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील डॉ. भीमराम आंबेडकर रूग्णालयात वीज नसल्याने रूग्णांची गैरसोय झाली आहे.  सायंकाळी उशिरा आलेल्या जोरदार वादळामुळे रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरापर्य़ंत वीज नसल्याने डॉक्टरांना मोबाईलच्या उजेडातच रूग्णावर टाके घालावे लागले.

रूग्णालयातील इनव्हर्टर काम करत नव्हता. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईक घामाघुम झालेले दिसले. जिल्हा रूग्णालयात प्रकाशयोजनेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. जनरेटर, इनव्हर्टर आणि सौर ऊर्जेची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यादिवशी काही काम करत नव्हते. अशावेळी इमर्जन्सी ओटीमधील मंद प्रकाशामुळे डॉक्टरांनी मोबाईलच्या लाईटवर रूग्णाला टाके घातले.

असे असूनही रूग्णालयात चारही बाजूला अंधार होता. रूग्णालयातील रूग्णांनी सांगितले की, मागच्या तासाभरापासून वीज नसल्याने रूग्णांसोबत नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. विचारणा केली असता रूग्णालय कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी सीएमएस राजकिशोर यांच्या म्हणण्यानुसार वादळामुळे लिंबाचे झाड पडून विजेची तार तुटली होती. ज्यामुळे वीज गेली. रूग्णालयाच इनव्हर्टरची व्यवस्था आहे. मात्र त्यावेळी इनव्हर्टर काम करत नव्हते. रूग्णालयात रूग्णांना कोणत्याही प्रकारची समस्या नाही. लवकरात लवकरत वीज आणण्याचा प्रयत्न केला.