
अजय जोशी । पाटोदा
पाटोदा आठवडी बाजारात भाजी विक्रेता सचिन गाढेकर यांच्या मानेवर खाज सुटण्याचे द्रव्य टाकुन एक लाख ऐंशी हजार रुपयांची पिशवी चोरांनी पळवून नेली. दिवसा लूट झाल्याने पोलीस प्रशासनाची कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.
पाटोदा येथील सचिन गाढेकर हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात ते गुरुवारी आठवडी बाजारात सकाळी आकराच्या दरम्यान वांगेचे कॅरेट घेऊन गेले होते त्यांना कॅरेट बाजार ठेऊन कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते त्यामुळे त्यांनी पैशांची पिशवी बरोबर ठेवली होती. त्यांच्यावर चोरांनी पाळत ठेवत ते खाली वाकताच काही तरी खाजसुटी द्रव्य टाकले. ते खाली वाकताच चोरांनी पिशवी उचलून पळ काढला. त्यानंतर लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला पण चोर सापडले नाहीत. एकाच आठड्यात घडलेल्या तीन घटनांनी पाटोदा हादरून गेले आहे.





























































