इंजिनीअरिंगसाठी ‘पीसीएम’ची गरज नाही! एआयसीटीईचा नवा नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीई, बीटेक या इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी बारावी सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (पीसीएम) या विषयांची गरज नाही. दरवर्षी इंजिनीअरिंगच्या रिक्त राहणाऱया जागा लक्षात घेता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्रवेशासाठी नवे धोरण जाहीर केले असून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून पीसीएम विषय ऑप्शनला टाकणारे विद्यार्थीही इंजिनीअरिंग प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे इंजिनीअर बनू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एआयसीटीईच्या नव्या नियमानुसार इंजिनीअरिंग प्रवेशासाठी बारावीत सामान्य विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण तर मागास प्रवर्गासाठी किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत. त्याचबरोबर एपूण 14 विषयांची यादीही एआयसीटीईने जाहीर केली असून यांपैकी कोणत्याही तीन विषयांत उत्तीर्ण असणारे विद्यार्थी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच इंजिनीअरिंगचे पदवी अभ्यासक्रम आणि टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्रवेशासाठीही पीसीएम विषयांची सक्ती राहिलेली नाही. विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणित, फिजिक्स, इंजिनीअरिंग ड्रॉइंग हे ब्रीज कोर्स विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतून येणाऱया विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, असे एआयसीईटीने प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेत स्पष्ट केले आहे.

14 विषयांची यादी

गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, पृषी, बिजनेस स्टडिज् आणि इंजिनीअरिंग ग्राफिक्स.

…तर गुणवत्ता घसरेल

एआयसीटीईच्या या नव्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचे इंजिनीअर बनण्याचे स्वप्न या निर्णयामुळे पूर्ण होणार असले तरी काही तज्ञांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल, असे मतही व्यक्त होत आहे.