पीअर्सन अंडरग्रॅज्युएट प्रवेश परीक्षा नोंदणी सुरू  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीअर्सन व्हीयूई कॉम्प्युटर आधारित टेस्टिंगसाठी जागतिक स्तरावरील अग्रगण्य संस्था यांनी ‘पीअर्सन (अंडरग्रॅज्युएट (स्नातकपूर्व) प्रवेश परीक्षा 2023’साठी हिंदुस्थानात नोंदणी सुरू केली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी 31 जुलैपर्यंत सुरू असणार आहे. पीअर्सन व्हीयूईच्या संख्यात्मक (क्वांटिटेटीव्ह), तोंडी आणि अॅबस्ट्रक्ट रिजनिंग प्रमाणित प्रवेश परीक्षेचा स्कोअर हिंदुस्थानातील 160 पेक्षा जास्त विद्यापीठांकडून (जनरल प्रोग्रॅम) आणि 120 विद्यापीठांकडून (इंजिनीअरिंग प्रोग्रॅम) स्वीकारला जातो. विद्यार्थ्यांची क्षमता आणि बुद्धिमत्ता ओळखून त्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देणे आहे हे या परीक्षेचे उद्दिष्ट आहे.