
कपडे उत्पादनात व्यापक स्वरुपात स्वच्छतेला चालना मिळावी आणि विषाणू-विरहीत कापड उपलब्ध व्हावे यासाठी पीटर इंग्लंड या मेन्सवेअर ब्रँडने नीम तुलसी कलेक्शनचे लॉन्च केले आहे.
यामाध्यमातून त्यांनी प्राचीन आयुर्वेदाची सांगड नवीन कलेक्शनसमवेत घातली आहे. उत्पादनात आयुर्वेदातील घटक, कडूनिंब आणि तुळशीचा समावेश करण्यात आला आहे. या कलेक्शन अंतर्गत पीटर इंग्लंड शर्ट, मास्व, जीन्स, बर्म्युडाज, कुर्ता आणि पायजमा लॉन्च करणार आहे. या उत्पादनांकरिता कंपनीने ‘एन्लीकेन’ तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यामध्ये 100 टक्के नैसर्गिक कडूनिंब, तुळस आणि इतर उपयुक्त औषधी वापरल्या आहेत. कपड्यांत हे हटके तंत्रज्ञान वापरण्याची पहिलीच वेळ आहे.





























































