दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्य़ा सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकरी व जनरल स्टोअर चालकाला कोयत्याच्या धाकाने खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारला अटक केली आहे. सुमित उर्फ सुम्या फ्रँन्की हॉल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका २७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कॅम्प परिसरातील  सोलापूर बाजार बस थांब्यासमोर घडली.

पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे कॅम्प परिसरात बेकरी व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. फिर्यादी दुकानात काम करत असताना, आरोपी सुमित तेथे गेला. त्याने फिर्यादींना तु मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे. तु माझ्या एरियात धंदा करतोस चल मला एक हजार रुपये हप्ता दे, नाहीत तुला सोडणार नाही असे म्हणत लपविलेला कोयता काढून हवेत फिरवला. मी इथला भाई आहे असे म्हणून कोयत्यासह लोकांच्या अंगावर धावून जात आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी आरोपी सुम्याला अटक केली आहे. तसेच पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.