महागाईची दहीहंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

– स्टेट बँकेचे कर्ज महागले
स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृह आणि वाहन कर्ज महागले आहे. बँकेने कर्जावरील व्याजदारात 0.20 टक्के वाढ केली असून आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. नव्या व्याजदर वाढीनुसार 20 वर्षांसाठी 25 लाख रुपये गृह कर्ज घेतलेल्यांना आता व्याजाचे 371 रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

– पेट्रोल-डिझेलचा भडका
इंधन दरवाढीचा भडका कायम आहे. महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल सर्वाधिक 86.09 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 74.76 रुपयांवर गेले आहे. पुण्यात पेट्रोल 85.79 तर डिझेल 73.27 रुपये प्रतिलिटर झाले आहे. रुपयांचे मूल्य घसरत असल्यामुळे पेट्रोल, डिझेलची दरवाढ यापुढील काळातही जनतेच्या माथी मारली जाणार आहे. इंधनदरवाढीमुळे मालवाहतूक, प्रवास महागला आहे.

– गाडय़ा महागल्या
नव्या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी थर्ड पार्टीला पाच वर्षांचा विमा उतरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारपासून गाडय़ा महागल्या. एक हजार सीसीखालील कारला तीन वर्षांच्या विम्यासाठी 5286 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 75सीसीखालील मोटार- सायकलला 1045 रुपये, 75 ते 150 सीसीसाठी 3285 रुपये, 150 ते 350 सीसी मोटारसायकलला 5453 रुपये द्यावे लागतील.