
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला विशेष आरास करण्यात आली आहे. अंगारकी निमित्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक आहेत. कोविडचं संकट अजूनही संपलेले नाही तेव्हा गर्दी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केल्याचं दिसून आलं. यावेळचे क्षण टिपले आहेत दैनिक सामनाचे प्रतिनिधी चंद्रकांत पालकर यांनी…






























































