Photo – काजल अग्रवालचं हटके डोहाळेजेवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंघमफेम अभिनेत्री काजल अगरवाल हिचं डोहाळेजेवण नुकतंच पार पडलं. काजलने काही महिन्यांपूर्वी आपली गोड बातमी प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्या डोहाळजेवणाचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, जरतारी साडी आणि काही मोजके दागिने अशा साध्या पण सुंदर वेशात काजल दिसून आली. तिच्या या साधेपणाची स्तुती नेटकरी करत आहेत.