
विरारच्या काशीद कोपर येथील मंदिराजवळ एका फोटोग्राफरने मोबाईलमधून निसर्ग बारकाईने टिपण्यासाठी कॅमेरा झूम केला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या फोटोग्राफरला लेन्समध्ये चक्क झाडाला लटकत असलेला मृतदेह दिसला. या दृश्यामुळे फोटोग्राफर चांगलाच हादरला.
काशीद कोपर येथील मंदिर परिसर येथे डोंगराळ भाग आणि दाट झाडी असल्याने अनेक भाविक व निसर्गप्रेमी येतात. एक फोटोग्राफर मोबाईलच्या कॅमेऱ्याने तेथील निसर्ग सौंदर्य कैद करत असताना एका झाडाला ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेला दिसला. त्याने तातडीने पोलीस ठाण्याला ही माहिती दिली.





























































