प्लास्टिक बॅग द्या व कापडी पिशवी भेट घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री – महाराष्ट्र राज्य रामदासभाई कदम यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील जनतेने प्लास्टिक बंदीचे स्वागत केले. पर्यावरण संवर्धनासाठी केलेली ही प्लास्टिक बंदी उपायकारक ठरेल ही जनतेला खात्री आहे. आपल्या भावी पिढीसाठी हा निर्णय योग्यच असल्याचे सर्व नागरिकांचे मत आहे. प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमधे जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शिवसेना, युवासेना सतत कार्यरत आहे.

दिनांक ८ जुलै २०१८ रोजी उपनगरातील बोरिवली, कांदिवली, चारकोप, मालाड, मागाठाणे, दहिसर या सहा विधानसभेत विविध ठिकाणी शिवसेना शाखा, युवासेना कार्यकारीणी सदस्य सिद्धेश रामदास कदम यांच्या सौजन्यांने नागरिकांकडून प्लास्टिक वस्तू गोळा करण्यात आल्या व त्याबदल्यात कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. सदर मोहिमे अंतर्गत “आपल्या घरातील प्लास्टिकच्या वस्तू आम्हाला द्या, त्याबदल्यात कापडी पिशवी आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून घ्या” असा संदेश देण्यात आला तसेच विविध गृहसंकुलांमधील नागरिकांनी आपल्या घरातील प्लास्टिकच्या वस्तू जमा करून कापडी पिशव्यांचा देखील स्वीकार केला.

सदर मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी युवासेना विभाग अधिकारी अभिषेक शिर्के, प्रदीप खेडेकर, प्रकाश नाटेकर, रुपाली जाधव, हरीश बोडके, रिझवान शेख, शिवराज शिर्के तसेच युवासेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्यामध्ये प्रामुख्याने गुरुचंद्रन पंडियाण, शैलेश भानुशाली, नितीन कासकर, योगेश केणी, आकाश बारसकर, अश्विनी काटे, सिद्धेश फडतरे, अक्षय सावंत, पराग पाटील आदी युवासेना पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.