
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी त्यांच्या रेशन दुकानाजवळच अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल अहमदाबाद महापालिकेने नोटीस बजावली आहे. प्रल्हाद मोदी यांना बजावण्यात आलेली ही नोटीस तिसरी आणि शेवटची आहे, असे महापालिका अधिकाऱयांनी सांगितले. त्या नोटिसीला दाद न मिळाल्यास प्रल्हाद मोदी यांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही, असेही त्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे सध्या छत्तीसगड येथे आहेत. आपल्या बांधकामावरून महापालिकेने नोटीस बजावल्याचे त्यांनी मान्य केले. आपल्यावर नोटीस बजावण्यात आल्याचे आपणांस निकटवर्तीयांकडून कळले, असे त्यांनी सांगितले.





























































