पंतप्रधान मोदी व्हॅटिकन सिटी येथे जाऊन पोप फ्रान्सिस यांना भेटणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषद आणि सीओपी-26 परिषदेसाठी रोम आणि ग्लासगो दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयात पंतप्रधान मोदी व्हॅटिकन सिटी येथे जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या दौऱयाबद्दल केरळ कॅथॉलिक बिशप काwन्सिलने स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदींचा हा दौरा 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असणार आहे. 29 ते 31 ऑक्टोबर या काळात ते रोममध्ये जी-20 शिखर परिषदेला उपस्थित असतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी व्हॅटिकन सिटीला भेट देणार असून पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. ही भेट दोघांमध्ये होणार की शिष्टमंडळ असणार हे अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, रोमनंतर पंतप्रधान मोदी ग्लासगो येथे सीओपी-26च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.