प्रयाग, अन्वी, विवान, ईशना यांना विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयाण ढगे, अन्वी साहू, विवान डिक्कर, ईशना नायडू यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पीएमडीटीए मानांकन अर्जुन टेनिस अकादमी 8 व 10 वर्षांखालील ब्राँझ सीरिज स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. बाणेर रोड येथील अर्जुन टेनिस अकादमीमध्ये ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत 8 वर्षांखालील मुलींच्या गटात अक्वल मानांकित अन्वी साहूने दुसऱया मानांकित यशवी मल्होत्राचा 7-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मुलांच्या अंतिम फेरीत अक्वल मानांकित प्रयाण ढगेने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱया मानांकित कियान पेंडुरकरचा 7-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.