खंडणी प्रकरणात काँग्रेस नगरसेवक सचिन मस्के याला पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील खाजगी शिकवणी चालकास 25 लाखांच्या खंडणीसाठी पळवून नेऊन मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला काँग्रेस नगरसेवक सचिन मस्के यास 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विनोद खटके काँग्रेस नगरसेवक पुनीत पाटील यांच्यासह अन्य चार जण फरार झाली असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

केवळ लातूरच नव्हे तर सबंध राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या खंडणी प्रकरणाने लातूरची मात्र पुरती बदनामी करून टाकली आहे. काँग्रेस नगरसेवक सचिन मस्के यास या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्‍याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या खंडणी प्रकरणात काँग्रेस नगरसेवक पूनीत पाटील, मुख्य सूत्रधार विनोद खटके आणि त्यांचे इतर चार साथीदार फरार झालेले आहेत. त्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत असले तरी अद्याप पर्यंत त्यांना यश मिळालेले नाही. दरम्यान या खंडणी प्रकरणात आता काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत. शरातील दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.