पवई आयआयटीत आजपासून ‘उष्णतेच्या लाटा’, दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. ज्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर पवई येथील आयआयटी मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेमध्ये देशातील तज्ञ सहभागी होणार आहेत.

13 फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी सकाळी 10.50 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. 14 फेब्रुवारीला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी 9.30 पासून दुपारी 2.30 पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.