एक रुपया दंडाच्या शिक्षेला प्रशांत भूषण यांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-bhushan

आपल्या ट्विटने न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना 1 रुपया दंड ठोठावला होता. ऍडव्होकेट भूषण यांनी तो दंड भरला. पण आता त्यांनी आपल्या या शिक्षेला आव्हान देणारी फेरयाचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आपण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत दंड भरला पण त्याचा अर्थ आपल्यावरील गुन्हा मान्य केला असा होत नाही, असा युक्तिवाद भूषण यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ऍडव्होकेट प्रशांत भूषण यांच्या वादग्रस्त ट्विटची स्वत:च दखल घेत त्यांच्याविरोधात स्यू मोटो प्रकरण दखल केले होते. या प्रकरणाच्या याचिकेत प्रशांत भूषण यांनी वरिष्ठ न्यायमूर्ती आणि न्यायपालिकेचा अवमान करणारे ट्विट केल्याचा ठपका ठेकण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भूषण यांना या प्रकरणी दोषी ठरवत 1 रुपया दंडाची शिक्षा ठोठावली होती. भूषण यांनी कोर्ट रजिस्ट्रीत दंड भरला. पण आपला गुन्हा कबुल करण्यास नकार देत न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली आहे. 14 सप्टेंबरला दाखल केलेल्या आपल्या फेरयाचिकेवरील सुनावणी आता शिखर न्यायालयाच्या मोठय़ा पिठापुढे व्हावी अशी विनंती ऍड. भूषण यांनी केली आहे.