मतदानाला चला! प्रशांत दामले, अनिल काकोडकर, मधु मंगेश करणार आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

निवडणूक आली की उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये तर जोश असतोच, पण मतदारांमध्येही दांडगा उत्साह असतो. मात्र ऐन मतदानादिवशी हा उत्साह मतदान केंद्रांवर काही दिसत नाही. अनेकजण एक तर बाहेरगावी उडनछू होऊन सुट्टी एन्जॉय करतात किंवा घरातच आळसावतात. निवडणूक आयोगाने आता अशा मतदारांचे पाय मतदान केंद्राकडे वळावेत यासाठी 12 निवडणूक दूतांची नियुक्ती केली आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून हे दूत मतदारांना ‘मतदानाला चला हो, मतदानाला चला’ अशी साद घालणार आहेत!

यांच्यावर जबाबदारी

प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी, निशिगंधा वाड, उषा जाधव, मधु मंगेश कर्णिक, डॉ. अनिल काकोडकर, स्मृती मंधाना, वीरधवल खाडे, राही सरनोबत, ललिता बाबर, नीलेश सिंगीत.

पहिल्यांदाच तृतीयपंथी निवडणूक दूत

निवडणूक आयोगाने देशात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची निवडणूक दूत म्हणून निवड केली आहे. सामाजिक कार्यकर्ता गौरी सावंत यांना हा मान मिळाला आहे. निवड झाल्याबद्दल अभिमान तर वाटलाच, पण प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे असे घरोघरी जाऊन सांगणार, असे गौरी यांनी सांगितले.