
सामना ऑनलाईन । लखनौ
रणवीर- दीपिका , प्रियांका -जोन्स यांच्यानंतर अजून एक बॉलीवूड अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. बुधवारी अभिनेता प्रतिक बब्बर याचा विवाह त्याची मैत्रीण सान्या सागर हीच्याबरोबर संपन्न झाला. उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात महाराष्ट्रीयन पद्धतीने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला.

लग्नात प्रतिकने क्रिम कलरची शेरवाणी घातली होती. तर सान्या नऊवारी साडीत खूपच सुंदर दिसत होती.





























































