महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत ‘भीम’ची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे मंगळवारी निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ते मणक्याच्या समस्येने ग्रस्त होते. प्रवीण कुमार यांनी 50 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. अभिनयात येण्यापूर्वी ते हॅमर आणि डिस्कस थ्रोचे खेळाडू होते. त्यांनी आशियाई खेळांमध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी चार पदके पटकावली आहेत