महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti Passed Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘महाभारत’ या मालिकेमध्ये त्यांनी पाच पांडवांपैकी एक असणाऱ्या ‘भीम’ची भूमिका साकारली होती.

मूळचे पंजाबमधील असलेल्या प्रविण कुमार सोबती यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’ या मालिकेतील त्यांची ‘भीम’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली होती. मात्र गेल्या काही काळापासून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी मदतीचे आवाहनही केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

कलेच्या दुनियेमध्ये येण्यापूर्वी प्रविण कुमार यांनी क्रीडा क्षेत्रातही हात आजमावला होता. हॅमर आणि डिस्कस थ्रो या खेळांमध्ये त्यांनी नाव कमावले होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी 2 सुवर्णपदक, 1 रौप्यपदक आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. आशियाई आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये पदक जिंकून त्यांनी देशाचे नाव जगाच्या पटलावर गाजवले होते.

खेळातील अलौकिक कामगिरीसाठी त्यांना मानाचा ‘अर्जुन’ सन्मानही मिळाला होता. खेळाच्या दुनियेमध्ये नाव कमावल्यानंतर त्यांना लष्करात सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)मध्ये नोकरी देखील मिळाली होती, परंतु काही वर्षानंतर त्यांनी अभिनायामध्ये कारकिर्द बनवण्याचे ठरवले आणि कलेच्या दुनियेमध्ये पदार्पण केले.

गेल्या वर्षी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्याला स्पाइलची समस्या असल्याचे म्हटले होते. तब्येत ठीक नसल्याने सध्या घरीच रहात असल्याचे त्यांनी म्हटले होते. पत्नी विना त्यांची देखभाल करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच आशियाई खेळांमध्ये पदक जिंकूनही पंजाब सरकारने आपल्याला पेन्शन दिली म्हणून प्रविण यांनी नाराजीही व्यक्त केली होती.