
सामना ऑनलाईन, मुंबई
एफवाय प्रवेशाच्या ऑनलाइन नावनोंदणीस मुंबई विद्यापीठाने 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत साडेपाच लाख अर्ज
ऑनलाइन नाव नोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1 लाख 90 हजार 460 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी 5 लाख 56 हजार 987 अर्ज आले आहेत.
- हेल्पलाइन -02066834821
- नोंदणीसाठी वेबसाईट-mum.digitaluniversity.ac
सुधारित वेळापत्रक
- अर्ज विक्री – 15 जूनपर्यंत
- ऑनलाइन नोंदणी- 15 जूनपर्यंत
- अर्जाची प्रिंट सादर करणे – 15 जूनपर्यंत
- (इन हाऊस, अल्पसंख्याक कोटा प्रवेशासाठी)
- पहिली गुणवत्ता यादी – 17 जून, सायं. 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी – 18 ते 20 जून.
- दुसरी गुणवत्ता यादी – 20 जून, सायं. 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी- 21, 22 व 24 जून
- शेवटची गुणवत्ता यादी – 24 जून, सायं 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी – 25 ते 27 जून





























































