नगर जिल्ह्यात वळीवाचा पाऊस कोसळला, बच्चेकंपनीने लुटला आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी रविवारी दिलासा मिळाला. नगर जिल्ह्यात काही ठिकाणी वळीवाच्या पावसाच्या सरी कोसळल्याने उन्हाचा पारा थोडा खाली आला. राहुरी आणि कोपरगाव तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

रविवारी दुपारी पारा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. अचानक सव्वा दोन वाजता सोसाट्याचा वारा सुटला, अंधारुन आले आणि वळवाचा पाऊस कोसळू लागला. तापलेल्या तव्यावर पाणी पडावे तसे तस्त्यावर पडणारे पावसाचे थेंब चर्र…र असा आवाज करत होते. भाजलेल्या मातीचा वास सर्वत्र दरवळत होता. पहिल्या वळवाच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पटापटा घरातील आबालवृद्ध लहान मुलांना घेऊन पावसात भिजण्यासाठी रस्त्यावर आले. वळवाच्या पावसाच्या सरी अंगावर घेताना सर्वांना सुखद दिलासा देत होता. जवळपास वीस मिनिट सरी कोसळत होत्या.

rain