
सामना प्रतिनिधी । बीड
बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने आज सुरूवात केली. बीड तालुक्यातील घाटसावळी, पिंपळनेर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यामुळे घाटसावळी आणि पिंपळनेर परिसरातील जनावरांच्या छावण्यांवर हाहाकार उडाला. जनावरांच्या छावण्यावर असणारे निवारे उडून गेले. तर छावण्यामध्ये पाणी साचले.
दुष्काळाच्या आठ-नऊ महिन्यानंतर वेध लागले ते मान्सूनचे, आज मान्सूनपूर्व पावसाने बीड जिल्ह्यामध्ये हजेरी लावली. घाटसावळी, पिंपळनेर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. पाऊस रिमझीम पडला असला तरी वादळी वाऱ्यामुळे मात्र चारा छावण्यावर हाहाकार उडाला. छावण्यावरील निवारे उडून गेले. तर पिंपळनेरच्या चारा छावणीमध्ये पाणी साचले. वातावरणामध्ये बदल झाल्याने तापमानामध्येही थोडी घट झाली आहे. तापमानात घट झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.






























































