नांदेडमध्ये पावसाची दोन तास तुफान बॅटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

>>विजय जोशी । नांदेड

राज्याच्या सीमेवर पोहोचलेल्या मान्सूनच्या आधीच महाराष्ट्रात पूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मराठवाड्यात देखील पूर्व सरी बरसल्या आहेत. विशेष म्हणजे नांदेडमध्ये गुरुवारी पहाटे देखील पावसानं जोरदार बॅटिंग करत शहराला धुतले.

गुरुवारी पहाटे ३ ते ५ पर्यंत नांदेड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दोन तास ‘सैराट’ पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सखल भागात गुडघाभर पाणी साठल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, किनवट आणि माहूर तालुक्यात ५० मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात सरासरी २९ मीमी पाऊस झाला आहे.