
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सूडबुद्धीने पाडल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नगर उपजिल्हा प्रमुख , गिरीश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन करण्यात येणार होते. यावेळी शिक्षक जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे, उपशहर प्रमुखअरुण झेंडे,कामगार सेना गौरव ढोणे आदि सह शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारकडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जात होते. जागतिक महामारी कोरोनाच्या काळामध्ये सरकारने जनतेला मोलाची मदत केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात आली. असे अनेक जनहितीचे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये नावलौकिक झाला होता. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांचे नाव पहिल्या पाच मुख्यमंत्र्यामध्ये आले होते. मात्र, मिंधे गटाला व भाजपला ते सहन झाले नाही आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले, असा आरोप उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला.
येथे कुस्तीच्या पारितोषिक वितरणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातच शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा जाहीर निषेध करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आंदोलन करण्यापूर्वीच शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पुढील कारवाई सुरू केली आहे.
































































