
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. तसेच अनेक सवालही उपस्थित केले आहेत.
- भिंतीवर आणि पोलवर एलईडी लावण्याचा निर्णय फक्त एलईडी कंपनीच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे.
- मुंबईकरांचा पैसा त्यांना आणि लोकप्रतिनिधींना न विचारता त्याची कंत्राटदारांवर उधळपट्टी करण्यात येत आहे.
- आता आपण मुंबईचा पैसा आणि बजेटवरच बोलणार आहोत.
- हे लोकशाहीसाठी घातक आहे, हे सर्व पक्षांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
- आता हुकूमशाहीचे राजकारण सुरू झाले आहे.
- आपण पालकमंत्री असताना नगरसेवकांची बैठक घ्यायचो, त्यांचेही म्हणणे आपण जाणून घेत होतो.
- ते प्रदूषण कमी झाल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही
- आता राजकारणातील आणि वातावरणातील प्रदूषण वाढत आहे.
- आमच्यात हिंमत होती, धमक होती, त्यामुळे जनतेचा फायदा केला
- आमच्या काळातील अनेक प्रकल्प या बजेटमध्ये आहेत.
- त्यांनी एफडीचा अभ्यास करावा आणि त्यातून मुंबईचा किती फायदा झाला, हे समजून घ्यावे
- अनेक प्रकल्प आपण एफडीतून करत आहोत, त्यामुळे कोस्टल रोडला टोल नाही.
- ते सर्व यांचे मित्र आहे. त्यामुळे मित्रांच्या दबाबातून हे बजेट आल्याचे दिसत आहे.
- धूळ येते कोठून बिल्डर आणि कंत्राटदारांकडून , त्यांच्यावर बंधने घालण्याची यांची हिंमत नाही
- एअर प्युरिफायर हा विषयच फुसका आहे. हे कुठेही उपयोगी पडत नाही.
- आम्ही जनतेचा पैसा जनतेसमोरच वापरत होतो, त्यामुळे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला याची घटनाबाह्य राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.
- गेल्या सहा महिन्यात जे सुरू आहे, त्यावरून आपण मोरल, लिगल आणि फायनाशियल दिवाळखोरीच्या दिशेने जात आहोत, असे दिसते.
- आता त्यांचेच सरकार असल्याने त्यांनी तातडीने हे पैसे महापालिकेला द्यावे
- साडेसात हजार कोटी राज्य सरकार मुंबई महापालिकेला देणे आहे.
- एफडीच्या व्याजातून आम्ही अनेक प्रकल्प केले.
- शिवसेनेने बजेट योग्य करत जनतेचा पैसा वाचवत महापालिका आम्ही फायद्यात आणली.
- शिवसेना महापालिकेत सत्तेवर आली, तेव्हा पालिका खर्चात होती.
- मुंबई पालिकेच्या एफडीबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, किती पैसा तुम्ही वापरत आहात, ते सांगा
- या बजेटमधून मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न होत आहे.
- कंत्राटदारांसाठी त्यांची उधळपट्टी सुरू आहे. मात्र, सामान्य जनतेचा फायदा होत असेल तर त्यांना ते नको आहे.
- या करातून येणारे उत्पन्न कमी झाले आहे, आम्ही केलेल्या वचनपूर्तीवर त्यांनी एकप्रकारे आरोप केला आहे.
- 500 स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांचा कर आपण रद्द केला
- महसूल कमी झाला असताना खर्च कमी करण्याची गरजही त्यांनीच व्यक्त केली आहे.
- गेल्या 25 वर्षात शिवसेनेने जनतेचा पैसा जपून वापरला, तसेच आताही हा पैसा जपून वापरला पाहिजे.
- हे सर्व सुरू असताना मुंबईथ लोकशाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
- जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे.
- बजेट मांडणारही तेच आणि मंजूरही तेच करणार, हे लोकशाहीला धरून आहे का
- 2500 कोटीत होणारे रस्ते 6500कोटींमध्ये होत आहे.
- स्काय वॉकची गरज आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे.
- स्काय वॉकसाठी 75 कोटी रुपये तरतूद आहे.
- 1700 कोटी सौैंदर्यी करणासाठी दिले आहेत. हे अधिकार त्यांना आहेत का
- हे बजेट मुंबईकरांसाठी नसून कंत्राटदार मित्रांसाठी आहे का
- कोणताही नवा प्रकल्प नसताना खर्च कसा वाढला
- नगरसेवक आणि महापैर नसताना नवे प्रकल्प सुरू करू नका, अशी आपली सूचना होती.
- आपण पत्र लिहून दिलेल्या सूचनेप्रमाणे कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची घोषणा नाही.
- मुंबई अर्थसंकल्पात जनतेने दिलेल्या सूचना कोठेही दिसत नाही.
- या अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईला काहीही देण्यात आलेले नाही.
- केंद्रीय अर्थसंकल्पात निवडणुका होणाऱ्या गुजरात आणि कर्नाटकसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबईच्या अर्थसंकल्पावर आमचे लक्ष होते.
- मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तर देण्यात आलेले नाही.
- राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत काहीही उत्तर देण्यात आलेले नाही.



























































