कोस्टल रोडसाठी पालिका ‘इन अॅक्शन’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’च्या कामाची आजपासून पूर्वतयारी सुरू केली आहे. मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाष मार्गावरील ‘गोविंद महल’समोरील क्षितिज समांतर बिंदू निश्चित करण्याचे ‘जागतिक स्थितीमापक उपकरण’ बसविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

अमर सन्स उद्यानाजकळ उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्की तेथे अनेक बांधकामे करण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. खान अब्दुल गफारखान मार्गावरील वरळी डेअरी व वरळी सी फेस पालिका शाळेसमोर पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे बांधकाम अत्यंत मजबूत करणे आकश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणचीही तांत्रिक तपासणीही करण्यात येत आहे.