
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्याचा मृतदेह प्रवेशद्वाराजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बाबा प्रेमदास असे त्या पुजाऱ्याचे नाव असून त्याचे एका स्थानिक नेत्यासोबत या मंदिराच्या जागेवरून वाद सुरू होते. त्या वादातूनच बाब प्रेमदास यांची हत्या झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
रायबरेलीतील इटौरा गावात एक राम जानकी मंदिर आहे. या मंदिराच्या जागेवरून बाबा प्रेमदास यांचे एका बाहुबली नेत्यासोबत वाद सुरू होते. या वादातूनच कुणीतरी पुजाऱ्यांची हत्या घडवून आणली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच गावकऱ्यांनी पोलिसांना मृतदेह उतरविण्यापासून देखील रोखले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येऊन आरोपींना अटक करण्याची हमी देत नाही तो पर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.


























































