लातूरमध्ये वीस हजाराची लाच स्विकारणाऱ्या मुख्याध्यापकाला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलासाठी 19,157 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या शारदा सदन अनुसूचित जाती प्राथमिक शाळा आर्वी येथील मुख्याध्यापक विठ्ठल व्यंकटराव मुचवाड यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

या शाळेतील तक्रारदारांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाच्या रकमेच्या 19 टक्के लाच म्हणून मुख्याध्यापक विठ्ठल मुचवाड यांनी मागितली होती. 12 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. 19,157 रुपये शारदा सदन अनुसूचित जाती प्राथमिक शाळा आर्वी येथील मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच त्यांनी ही रक्कम स्विकारली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपअधिक्षक पंडीत रेजीतवाड हे करीत आहेत.