
दिल्ली एका व्यक्तीने आपल्या पुतण्या आणि ड्रायव्हरसोबत मिळून आपल्याच पत्नीचा खून केला आहे. या प्राध्यापकाचे आपल्या बायकोसोबत पटत नव्हते, सारखे खटके उडत असल्याने तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले होते.
वीरेंद्र आपल्या आई वडील आनि पुतण्यासह दिल्लीत रहात होता. काही वर्षांपूर्वी वीरेंद्रचे एका महिलेसोबत लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर काहीच आलबेल नव्हते. दोघांमध्ये सारखे वाद आणि भांडणे होत होती. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी पत्नीने वीरेंद्रच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे वीरेंदच्या मनात आपल्या पत्नीबद्दल फक्त राग आणि चीड निर्माण झाली होती.
म्हणून पुतण्याने साथ दिली
वीरेंद्रच्या पत्नीच्या हत्येत त्याच्या पुतण्यानेही साथ दिली होती. आपल्या काकांवर आपले खूप प्रेम आहे, त्यांच्या आनंदासाठी आणि सुखासाठी आपणकहई करू शकतो असे वीरेंद्रच्या पुतण्याने आपल्या कबुलीजबाबात सांगितले.
तिघांनी मिळून केला खून
वीरेंद्रचे आई वडील वृद्ध आहेत. वडिलांना चालता येत नाही आणि व्यवस्थित एकू येत नाही. एका संध्याकाळी वीरेंद्र आपल्या आईला घेऊन रुग्णालयात गेला. जेणेकरून त्याच्यावर खुनाचा कुठलाच आरोप होऊ नये म्हणून. तेव्हा वीरेंद्रचा ड्रायव्हर घरात शिरला आणि त्याने वीरेंद्रच्या पत्नीचा गळा आवळला. जेव्हा ड्रायव्हर वीरेंद्रच्या पत्नीचा खून करत होता, तेव्हा पुतण्यात घराबाहेर थांबून कोणी येत नाही ना याची खबरदारी घेत होता. अखेर वीरेंद्रच्या पत्नीचा मृत्यू झाल्यनंतर ती जिवंत आहे की नाही हे तपासण्यासाठी ड्रायव्हरने मृतदेहाला करंट दिला.
म्हणून ड्रायव्हरने काढला काटा
वीरेंद्रचे लग्न होण्यापूर्वी हा ड्रायव्हर वीरेंद्रकडे राहत होता. तसेच वीरेंद्रची एक गाडी हा ड्रायव्हर भाड्याने चालवत होता. वीरेंद्र त्याला महिन्याला पगार देत नसत. जेव्हा गरज पडेल तेव्हा ड्रायव्हर वीरेंद्रला पैसे देत असत. ड्रायव्हर वीरेंद्रच्या घराच्या छतावर एका छोट्याच्या खोलीत आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. परंतु नंतर वीरेंद्रचे लग्न झाले आणि वीरेंद्रच्या पत्नीने त्याला कामावरून काढण्यास सांगितले. वीरेंद्रची इच्छा नसतानाही ड्रायव्हरला काढावे लागले. ड्रायव्हरला याचा खूप राग आला. बदला घेण्यासाठीच त्याने वीरेंद्रच्या सांगण्यावरून या महिलेचा खून केला.



























































