‘प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर्स असोसिएशन’ची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिल्पकारांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर्स असोसिएशन’ या नव्या राष्ट्रीय व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात त्याची अधिपृत घोषणा करण्यात आली.

शिल्पकारांसाठी सक्षम, संघटित आणि दूरदृष्टी असलेले व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शिल्पकारांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यातील सहकार्याची भावना वाढवणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. यासोबतच शिल्पकारांसाठी विविध कार्यशाळा, प्रदर्शने आणि प्रशिक्षण उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाईल. उत्पृष्ट शिल्पकलेला प्रोत्साहन देऊन शिल्पकारांच्या कलापृतींचा देश-विदेशात व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टही असोसिएशनने ठेवले असल्याची माहिती असोसिएशनचे नीलेश पोवळकर आणि संतोष शेलार यांनी दिली.