राजीनाम्यासाठी पर्रीकरांच्या घरावर आज गोयंकरांचा मोर्चा

17

सामना ऑनलाईन, पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दीर्घकालीन आजारपणाचे पडसाद उमटू लागले आहेत. आता तर विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष एकत्र आले असून उद्या पर्रीकर यांच्या डोनापावला येथील खासगी निवासस्थानावर सामाजिक कार्यकर्ते, निमसरकारी संस्था आणि काँग्रेससह अन्य काही पक्षांचे पदाधिकारी मोर्चा काढणार आहेत. पर्रीकर यांनी आजारी असूनही मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वतःकडे ठेवली असल्याचा परिणाम प्रशासनावर होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन चालावे म्हणून पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अन्य एखाद्या मंत्र्याकडे सोपवावा अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या