पुलवाम्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा जिह्यातील त्राल भागात बुधवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ‘अन्सार गझवत-उल-हिंद’चा दहशतवादी सफात मुझफ्फर सोफी ऊर्फ मुआविया आणि ‘लष्कर-ए-तोएबा’चा उमर तेली ऊर्फ तल्हा अशी चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

त्राल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस आणि लष्करातर्फे संयुक्तपणे सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक उडाली.