पुणे – वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील आंबेगाव बुद्रूक आणि हडपसरमधील मांजरी परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण ठार झाले. हे अपघात काल घडले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव वेगातील खासगी ट्रॅव्हल चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेगाव बुद्रूक परिसरात घडला. श्रीकांत निवृत्ती पवार (वय – 43, रा. आंबेगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल चालक आमरेश मनोहर गुंजटे (वय – 30, रा. बसावा, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई अजित कोकरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात का सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मांजरीतील गोपाळपट्टीत घडला. अनिल रामप्रसाद राजभर (वय – 24, रा. गोपाळपट्टी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज धोडमिसे (वय – 28, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील तपास करीत आहेत.